राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन

By Admin | Updated: August 18, 2015 11:30 IST2015-08-18T11:22:10+5:302015-08-18T11:30:25+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे आज सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी निधन झाले.

President Pranab Mukherjee's wife passed away | राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या  शुभ्राज मुखर्जी यांनी आज सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 
शुभ्रा मुखर्जी यांच्यावर दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या ए.आर.आर. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राष्ट्रपती मुखर्जी ओडिशा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले होते. मात्र अखेर आज शुभ्रा मुखर्जी यांचे निधन झाले. 

Web Title: President Pranab Mukherjee's wife passed away