जनतेचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना अखेरचा निरोप
By Admin | Updated: July 30, 2015 12:10 IST2015-07-30T11:54:44+5:302015-07-30T12:10:20+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला आहे
जनतेचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना अखेरचा निरोप
>ऑनलाइन लोकमत
रामेश्वरम (तामिळनाडू), दि. ३० - भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला आहे. सोमवारी शिलाँगमध्ये भाषण करताना व्यासपीठावरच अंतिम श्वास घेतलेल्या कलामांना अब्जावधी भारतीयांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी, काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम व गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक मान्यवर रामेश्वरममध्ये कलामांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
शिलाँग येथे २७ जुलै रोजी डॉ. कलाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर संपूर्ण देशासह जगभरात हळहळ व्यक्त होत असताना त्यांचा जन्म आणि बालपण बघणारे रामेश्वरम हे छोटेसे गाव शोकसागरात बुडाले होते. बुधवारी तेथे दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. हजारो लोकांनी त्यांना अखेरचे बघता यावे यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. उन्हात अनेक लोक तासन्तास बसून असल्याचे दृश्य होते. गर्दीने हे गाव फुलून गेले होते.