राष्ट्रपती मुखर्जी मतदान करणार नाहीत
By Admin | Updated: May 8, 2014 11:34 IST2014-05-08T11:34:56+5:302014-05-08T11:34:56+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीत. परंतु त्यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी या मात्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राष्ट्रपती मुखर्जी मतदान करणार नाहीत
पत्नी शुभ्रा बजावणार हक्क
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीत. परंतु त्यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी या मात्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती मुखर्जी यांनी आधी मतदान करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रपती सचिवालयाने दोन टपाल मतपत्र पाठविण्याची लेखी विनंतीही निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु दरम्यानच्या काळात आपल्या पूर्वाधिकार्यांनी मतदान करण्याबाबत कोणता निर्णय घेतला होता, हे जाणून घेण्यासाठी मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनाच्या इतिहासाची पाने चाळली. अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील वगळता अन्य कोणत्याही राष्ट्रपतीने मतदानाचा हक्क कधी बजावलेला नाही, असे राष्ट्रपती भवनातील दस्तऐवजावरून दिसून आले. कायदेशीर सल्लागार टी. के. विश्वनाथन यांचाही त्यांनी सल्ला घेतला. ही बाब मुखर्जी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी, निवडणूक आयोगाकडून पत्नी शुभ्रा यांच्यासाठी केवळ एकच टपाल मतपत्र मागविण्याचे निर्देश आपल्या सचिवालयाला दिले. शुभ्रा याच केवळ मतदान करतील आणि पदावर असताना राष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय विचारांपासून अलिप्त असतात. त्यामुळे आपण मतदान करणार नाही, असा निर्णय मुखर्जी यांनी घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. -