शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

President Election: कोण असेल विरोधी पक्षांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही नावं आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 20:32 IST

President Election 2022: लवकरच सत्ताधारी भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. तर आता विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार की, एनडीएच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होणार याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम जाहीर केला आहे. आता लवकरच सत्ताधारी भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. तर आता विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार की, एनडीएच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होणार याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद यांचं नाव पुढे आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षांमध्ये एकमत तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस नेत्यांने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार काँग्रेसचा असू शकतो किंवा टीएमसीचा उमेदवार असू शकतो.  काँग्रेसमध्ये पक्षपातळीवर गुलाम नबी आझाद यांच्या नावावर पक्षाच्या पातळीवर चर्चा झाली आहे. गुलाम नबी आझाद यांचे विरोधी नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मात्र हे नाव अंतिम झालेले नाही.

जर काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावर विरोधी पक्षांचं एकमत न झाल्यास तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव समोर येऊ शकतं. त्यावर विरोधकांचं ऐक्य झाल्यास त्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देऊ शकतो.

सध्या एनडीएकडे ४८.५ टक्के तर बिगर एनडीए पक्षांकडे ५१.५ टक्के मते आहेत. यात यूपीए पक्षांचा वाटा हा २४ ते २५ टक्के आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आता सर्व काही बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. मात्र या पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे, असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांशी चर्चा करून ज्याच्याबाबत एकमत होईल, असा उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न करेलं.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूकcongressकाँग्रेस