राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपची जबरदस्त खेळी, अरविंद केजरीवालांची झाली कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:36 PM2022-06-22T20:36:48+5:302022-06-22T20:37:37+5:30

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी देखील याच दुविधेत सापडली आहे. आतापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वाट पाहणाऱ्या या पक्षाने, आता म्हटले आहे, की पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

president election Arvind kejriwal aap stand on president election draupadi murmu and yashwant sinha | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपची जबरदस्त खेळी, अरविंद केजरीवालांची झाली कोंडी?

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपची जबरदस्त खेळी, अरविंद केजरीवालांची झाली कोंडी?

googlenewsNext

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. तर विरोधी पक्षांनी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचे नाव या निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकीकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आपापली गणिते बळकट करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काही पक्ष असेही आहेत, ज्यांनी अद्याप पर्यंत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करायचे, की विरोधकांना बळकटी द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही.

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी देखील याच दुविधेत सापडली आहे. आतापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वाट पाहणाऱ्या या पक्षाने, आता म्हटले आहे, की पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

विरोधकांकडून करण्यात आलेल्या सिन्हा यांच्या नवासंदर्भात बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजयसिंह पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "जेव्हा पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतील तेव्हा आपल्याला सांगितले जाईल." पुन्हा विचारले असता ते म्हणाले, "अंतिम निर्णय पक्षाचे शीर्ष नेतृत्वच घेईल, एवढेच यावेळी सांगू शकतो,'' असे ते म्हणाले.

भाजपच्या खेळीत आपची गोची? -
नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. भाजपविरुद्धच्या लढाईत आप स्वतःला काँग्रेसचा पर्याय म्हणून प्रेझेंट करताना दिसत आहे. अशा स्थितीत पक्ष विरोधी उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मानले जात होते. मात्र भाजपच्या आदिवासी खेळीने 'आप'ची कोंडी केली आहे. अलिकडच्या काळात केजरीवाल स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणूनही प्रेझेंट करत आहे. अर्था आता द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठ फिरवणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

१८ जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होणार -
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य असलेल्या इलेक्टोरल सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. सुमारे १०.८६ लाख मतांच्या इलेक्टोरल मंडळात भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला ४८ टक्क्यांहून अधिक मते असल्याचा अंदाज आहे आणि काही प्रादेशिक पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: president election Arvind kejriwal aap stand on president election draupadi murmu and yashwant sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.