शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Presidential Election 2022: दोन मुले आणि पतीचा मृत्यू; नगरसेवक पदापासून सुरुवात, असा आहे द्रौपदी मुर्मूंचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:26 IST

President Draupadi Murmu: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.

President Draupadi Murmu: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. तिसऱ्या फेरी अखेर मुर्मू यांना 812, तर यशवंत सिन्हा यांना 512 मते मिळाली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आले होते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. 

जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू?द्रौपदी मुर्मू 2015-2021 दरम्यान झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. 20 जून 1958 रोजी ओरिसामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झाले. प्राथमिक शिक्षण मूळ जिल्ह्यातून पूर्ण केल्यानंतर भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळ या क्षेत्रात काम केले.

नगरसेवक पदापासून सुरुवातशिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मुर्मूंनी 1997 मध्ये नगरसेवक होऊन राजकारणात प्रवेश केला. तीन वर्षांनी 2000 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. यादरम्यान, त्या राज्यातील भाजप-बीजेडी सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीही होत्या. मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या राज्यपालही झाल्या. झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. एवढेच नाही तर देशातील कोणत्याही राज्याच्या राज्यपाल बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला नेत्या होत्या.

सरकारी नोकरीही केलीद्रौपदी मुर्मू यांनी 1980 मध्ये श्याम चरण मुर्मूंसोबत प्रेमविवाह केला. मुर्मूंना तीन आपत्ये होती, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला तर तिसरी मुलगी बँकेत काम करते. द्रौपदी मुर्मू यांनी 1979 ते 1983 या काळात पाटबंधारे आणि विद्युत विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. 1994 ते 1997 पर्यंत त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर, रायरंगपूर येथे मानद सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी केली. 

मुलांच्या मृत्यूने धक्काएक काळ असा होता की, द्रौपदी मुर्मूंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. 2009 मध्ये द्रौपदी मुर्मूंच्या मोठ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त 25 वर्षांचा होता. हा धक्का सहन करणे आई म्हणून खूप कठीण होते. यानंतर 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पतीलाही गमावले. अशा स्थितीत मुर्मूंनी स्वत:ला आणि मुलीला सांभाळले. दोन्ही मुले आणि त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मूंना मोठा धक्का बसला होता. या घटनांमुळे दुखावलेल्या मुर्मींनी पहारपूरमधील घराचे शाळेमध्ये रूपांतर केले. आता या शाळेत मुलांना शिक्षण दिले जाते. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022nda puneएनडीए पुणे