शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना प्रवेश नाकारला? पुजाऱ्याने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:10 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मंदिरातील फोटो सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताय.

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. द्रौपदी मुर्मू यांचे राजधानी दिल्लीतील जगन्नाथ मंदिरातील हा फोटो असून, यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिरात राष्ट्रपती मुर्मू आदिवासी समाजातील असल्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर दावा केला जातोय. मात्र मंदिर प्रशासनाने असा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. 

नेमका काय वाद?राष्ट्रपती भवनाने 20 जूनपासून एक ट्विट केले होते, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीतील श्री जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात आले. ट्विटमध्ये लिहिले की, 'भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेच्या प्रारंभानिमित्त मी सर्व देशवासियांना, विशेषत: भगवान जगन्नाथांच्या भक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. भक्ती आणि समर्पणाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मी महाप्रभू जगन्नाथांना प्रार्थना करते. जय जगन्नाथ!'

राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी देवाचे दर्शनही घेतले. तो दिवस मुर्मू यांच्यासाठी खूप खास होता, कारण 20 जून रोजी राष्ट्रपतींचा वाढदिवस असल्याने त्या श्री जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरातील फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. फोटोंमध्ये मुर्मू मंदिराच्या गर्भगृहाबाहेर उभे राहून पूजा करताना दिसत आहेत, तर मंदिराचे पुजारी गर्भगृहाच्या आत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांनी या फोटोवर आक्षेप घेत राष्ट्रपतींना येथील मंदिरात प्रवेश न देणे चुकीचे असल्याचे म्हटले. अनेकांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान यांची जुनी छायाचित्रे ट्विट केली, ज्यात ते गर्भगृहात उभे राहून पूजा करताना दिसत आहेत.

वादावर मंदिर प्रशासन काय म्हणाले?हा वाद सुरू असताना मंदिराच्या पुजाऱ्याने पुढे येऊन संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, मंदिराचे पुजारी सनातन पाडी म्हणाले की, श्री जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. कुठल्याही जातीचा हिंदू मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश आणि पूजा करू शकतो. मंदिरात येणारे सर्व भाविक बाहेरुनच पूजा करतात. त्या दिवशी राष्ट्रपती वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती पूजेला आल्या होत्या, त्यामुळे त्यांनी बाहेरून पूजा केली. ज्या लोकांना अधिकृतपणे आमंत्रित केले जाते, त्यांनाच मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जातो. त्या दिवशी राष्ट्रपती खासगीरित्या मंदिरात आल्या होत्या, म्हणूनच त्यांनी बाहेरुन पूजा केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांचे फोटोही रथयात्रेतील आहेत. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूNew Delhiनवी दिल्लीTempleमंदिरSocial Mediaसोशल मीडिया