शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून २०२४ची जय्यत तयारी! ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्यांना दिल्लीत बोलावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 09:54 IST

पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पुढील चार दिवस दिल्लीतच आहेत

संजय शर्मा 

नवी दिल्ली - सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या तयारीसाठी भाजपाने देशभरातील सर्व राज्यांच्या संघटनेशी मॅरेथॉन चर्चेच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आता सर्वांच्या नजरा केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलाकडे लागलेल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत २८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. तेव्हाच केंद्र सरकार व भाजपमधील बदलांबाबत चर्चा सुरू झाली.

आजही भाजपच्या सर्व राष्ट्रीय मोर्चांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती. तसेच दक्षिण भारतातील राज्यांची बैठक तेलंगणाच्या हैदराबादेत बोलावली होती. मागील एक आठवड्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपच्या ज्या नेत्यांना मंत्री केले जाणार आहे, त्यांना शपथविधीपूर्वी जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एकेक करून बोलावले जाणार आहे, अशी चर्चा आहे. 

पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पुढील चार दिवस दिल्लीतच आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली बाहेरील कार्यक्रमांतही बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांत मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा