तयारी जय्यत, प्रतीक्षा पाहुण्यांची

By Admin | Updated: January 23, 2015 01:44 IST2015-01-23T01:44:05+5:302015-01-23T01:44:05+5:30

भारतात दाखल होणाऱ्या बराक ओबामा यांच्या या दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे.

Preparing the city, waiting guests | तयारी जय्यत, प्रतीक्षा पाहुण्यांची

तयारी जय्यत, प्रतीक्षा पाहुण्यांची

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून २५ जानेवारीला तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल होणाऱ्या बराक ओबामा यांच्या या दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे. ओबामा यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचा अध्यक्ष सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ््यास लावत असलेली हजेरी हा विलक्षण कुतुहलाचा विषय बनला आहे. भारत ‘अतिथी देवो भव’ म्हणत यजमानाची भूमिका निभावण्यास सज्ज आहे. अनेक अर्थ आणि तितकेच पैलू लाभलेल्या या दौऱ्याचा हा विविधांगी धांडोळा.

विमानातील व्हाईट हाउस आणि अत्याधुनिक कार
ओबामांचा ताफा, त्यांचा तामझाम हे सारे जनसामान्यांसाठी अद््भुत आहे. त्यांचे एअरफोर्स वन हे विमान, अभेद्य कवच लाभलेली काळ््या रंगाची बीट््स कार...त्यातील व्यवस्था, त्यातील तंत्रज्ञान सारे काही महासत्तेला शोभेसे आहे. हा सगळा थाट भारतवासीय तीन दिवस अनुभवणार आहेत...

कॅडिलॅक
लांबी - ५ मीटर
वजन - ७.५ टन
किंमत - ३००००० अमेरिकन डॉलर
माइलेज - ५ किमी प्रती गॅलन

चालक
गुप्तचर विभागातील अत्यंत निष्णांत व्यक्ती कशाही प्रकारे, अगदी १८० डिग्री कोनातूनही गाडी वळवू शकेल इतका तरबेज.

बॉडी : लष्करी अवजड वाहनांसाठी वापरण्यात येणारे १२ सें.मी. जाडीचे दुप्पट मजबुतीकरण केलेले पोलाद, अ‍ॅल्युमिनिअम, टॅटिनिअम आणि सिरॅमिकचा वापर

इंधनाची टाकी
चिलखती, अग्निरोधक, थेट त्यावर मारा झाल्यावरही कोणतीही होणार नाही अशी मजबूत

पुढील बम्पर रात्रीच्या अंधारातही सुस्पष्ट चित्रीकरण करणारा कॅमेरा अश्रूधुराच्या नळकांड्या

टायर : गुडइयर कंपनीचे अतिशय उच्च प्रतीचे आणि पंक्चर प्रतिंबधक टायर नसतानाही व्यवस्थित धावू शकतील असे स्टीलचे चाक.

दरवाजे : बायोकेमिकल हल्ल्यांचा परिणाम न होणारे, अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटांतही मजबूत राहणारे, काचा विविध थर असलेल्या आणि बोइंग ७५७ विमानात वापरण्यात येणाऱ्या १२ सें.मी. जाड

अंतर्गत रचना : स्वदेशी बनावटीचा सॅटेलाइट फोन, ज्याद्वारे उपराष्ट्राध्यक्ष आणि पेन्टागॉनशी थेट संपर्क, रेमिंग्टन शॉटगन

ट्रंक : आॅक्सिज टँक, अग्निरोधक उपकरणे, ओबामांच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या रक्ताची ब्लड बँक

अमेरिकेचा कोट्यवधी डॉलरचा खर्च
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून २५ जानेवारी रोजी तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यावर ओबामा यांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचा खर्च करत आहे. रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ओबामा यांचे नवी दिल्लीत आगमन होईल. ओबामा यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. २०१० मध्ये ओबामा भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने १ हजार कोटी रुपये (२०० दशलक्ष डॉलर) खर्च केले होते; पण यावेळच्या भारत भेटीत ओबामा यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. ओबामा यांच्या सुरक्षेसाठी असलेला डॉग स्क्वॉड भारतात पोहोचला आहे. त्याला इलाईट के -९ असे म्हटले जाते.

किचनसह एकावेळी २००० लोक जेऊ शकतील एवढी डायनिंग रूम


भोपाळ गॅस गळतीवर बोलण्याचा आग्रह
दावोस : मानवाधिकार संघटना अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे आगामी दौऱ्यात भोपाळ गॅस गळतीचा मुद्दा उपस्थिती करण्याचा आग्रह केला आहे. संघटनेचे महासचिव सलिल शेट्टी म्हणाले, लोक अनेक दशकांपासून न्याय आणि आपल्या अधिकारांची वाट पाहत आहेत. त्या संकटाचे परिणाम आजही दिसून येतात.
 

 

Web Title: Preparing the city, waiting guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.