शपथविधीसाठी राजधानी सज्ज

By Admin | Updated: May 26, 2014 02:34 IST2014-05-26T02:34:15+5:302014-05-26T02:34:15+5:30

नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणार्‍या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन खास सजले असून तेथील विशाल प्रांगण संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे

Prepare the capital for the swearing-in | शपथविधीसाठी राजधानी सज्ज

शपथविधीसाठी राजधानी सज्ज

जयशंकर गुप्त, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणार्‍या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन खास सजले असून तेथील विशाल प्रांगण संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे. देश-विदेशातील पाहुण्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. निमलष्कर दल आणि दिल्ली पोलिसांनी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला असून दिल्लीतील भडकलेला पारा पाहता थंड वातावरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाला एकहाती बहुमत मिळवून देणारे मोदी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसोबत शपथ घेतील तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे आणि सार्क राष्टÑांच्या अन्य प्रमुखांसह सुमारे तीन हजार पाहुणे त्याचे साक्षीदार असतील. राष्टÑपती प्रणव मुखर्जी मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. याप्रसंगी मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहतील. मोदींच्या तीनही भावांना निमंत्रण मिळाले असून मोदी यांच्या मातोश्री हिराबा याही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करजाई, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम, बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना पूर्वनियोजित जपान दौर्‍यावर असल्यामुळे त्यांच्याऐवजी संसदेच्या सभापती शिरीन चौधरी सहभागी होतील.

Web Title: Prepare the capital for the swearing-in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.