शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:36 IST

धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. 

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक घेण्याच्या पूर्वतयारीस सुरुवात केल्याची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी दिली. दोन दिवसांपूर्वी जगदीप धनखड यांनी अनपेक्षितपणे उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नव्या उपराष्ट्रपतींची निवड करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पूर्वतयारीशी निगडित सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. 

धनखड यांनी केली सामानाची आवराआवरउपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांनी शासकीय निवासस्थानात  आवराआवर सुरु केली आहे. ते लवकरच दुसरीकडे राहायला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनखड हे संसद भवन संकुलाजवळील चर्च रोडवर नव्याने उभारलेल्या उपराष्ट्रपती एन्क्लेव्हमध्ये एप्रिल २०२४ पासून राहण्यास गेले होते.पंतप्रधान मोदी यांच्याशी अमित शाह यांची चर्चागृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर तसेच लोकसभा, राज्यसभेतील कामकाज, विरोधकांनी सातत्याने येत असलेले अडथळे या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे कळते. 

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारत