शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संसदेत होणार आर या पार, सरकार व विरोधकांची जय्यत तयारी; विरोधी पक्षांची चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 08:04 IST

२० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असून, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली : सरकार व विरोधी पक्षांकडून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मणिपूर, समान नागरी कायद्यासारख्या मुद्द्यांवर संसदेत धूमशान होणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक सरकावर हल्लाबोल करतील. मोदी सरकार समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे.

२० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असून, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याच्या एक दिवस आधी १९ जुलैला सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तसे पाहता ही बैठक प्रत्येक संसद अधिवेशनापूर्वी बोलावणे, ही औपचारिकता मानली जाते; परंतु या बैठकीपूर्वीच सरकारने विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू केली आहे.केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार संसदेत विरोधकांना प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याची पूरेपूर संधी देऊ इच्छित आहे. सरकारकडून या मुद्द्यांना उत्तर दिले जाईल. 

विरोधकांचा प्लॅन काय? १८ जुलैला विरोधी पक्षांनीही बैठक बोलावली असून, त्यात सरकारला घेरण्याची रणनीती तयार केली जाईल. यात मणिपूरमधील हिंसा, ओडिशामधील रेल्वे अपघात, खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती, चीनकडून सीमेचे उल्लंघन, समान नागरी कायद्यासारखे प्रमुख मुद्दे आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी खूपच गंभीर आहेत. त्यांनी स्वत: मणिपूरचा दौरा केलेला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्याप सरकारकडून देण्यात आलेली नाहीत.

विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्यावर लक्षसरकारकडून विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्याच्या मुद्द्यावर लक्ष दिले जात आहे. समान नागरी कायद्यावर विरोधकांमध्ये मतैक्य होऊ शकलेले नाही. आम आदमी पार्टी, बसपासारख्या पक्षांनी यापूर्वीच समान नागरी कायद्याला पाठिंबा दिलेला आहे. भाजपला बिजू जनता दल, तेलगू देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस व बीआरएसकडूनही अपेक्षा आहेत. हे पक्ष विरोधकांच्या आघाडीबाहेर राहून सरकारचे महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यास मदत करू शकतात, असे सरकारला वाटते.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनBJPभाजपाcongressकाँग्रेस