शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ ची तयारी सुरू; अमेठीतून स्मृती इराणी, अक्षय कुमार दिल्लीतून लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:58 IST

अक्षयकुमारने अलिकडेच भारताचं नागरिकत्व मिळवलं आहे

संजय शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुन्हा निवडणूक लढविण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी वायनाडला का गेले, असे अमेठीची जनता आता त्यांना विचारणार आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. राहुल गांधी अमेठीमधूनच लढणार, अशी घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केल्यानंतर राजकारण तापले आहे.

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या अमेठीमधून निवडणूक लढविण्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला आता अमेठीत काही करावे लागणार नाही. अमेठीची जनताच राहुल गांधी यांना विचारणार आहे की, अखेर त्यांना केरळच्या वायनाड मतदारसंघात का जावे लागले?

इराणी यांनी गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना ५५,१२० मतांनी पराभूत केले होते. तेव्हा अमेठीबरोबरच राहुल यांनी सुरक्षित मतदारसंघ वायनाडमधूनही निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. अमेठी मतदारसंघ गांधी कुटुंबीय सहजासहजी सोडणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.

अक्षयकुमार दिल्लीच्या चांदनी चौकातून लढण्याची चर्चा

  अलीकडेच कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व घेणारे चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांना भाजपच्या तिकिटावर दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाऊ शकते.   भाजपचे ज्येष्ठ नेते अक्षयकुमारच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक कामांची अक्षयकुमारने सार्वजनिकरीत्या अनेकदा स्तुती केलेली आहे.   अक्षयकुमार एकेकाळी दिल्लीच्या चांदनी चौकातील प्रसिद्ध ‘पराठेवाली गली’मध्ये राहत होता.   चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या डॉ. हर्षवर्धन करीत आहेत. त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीAkshay Kumarअक्षय कुमारBJPभाजपा