शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा व काँगे्रसविरोधी आघाडीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:33 IST

तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.

हैदराबाद  - तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.देश पातळीवर काँग्रेसेतर व भाजपेतर पर्यायाची गरज असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. हे काही घाईत टाकलेले पाऊल नाही. राव यांची वक्तव्ये ही गांभीर्याने घेण्याची गरज टीआरएसच्या नेत्यांनी बोलून दाखवली. प्रादेशिक पक्षांना एका व्यासपीठावर आणावे ही कल्पना राव यांच्या डोक्यात आहेच, असे सांगून टीआरएसचा नेता म्हणाला की, काँग्रेस व भाजपसारख्या मोठ्या पक्षांसोबत काम करतानाचा प्रादेशिक पक्षांचा अनुभव फारसा चांगला नाही, या निष्कर्षाला केसीआर आले आहेत.राष्ट्रीय स्तरावरील मोठे राजकीय पक्ष त्यांच्या आघाडीतील भागीदार पक्षांशी फारच थोडा समन्वय राखतात, असा अनुभव आहे. हा मुद्दा महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीत सुरू असलेल्या तणावातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष व भाजपा यांच्या नात्यात निर्माण झालेल्या तणावातून स्पष्ट होईल, असे राव म्हणाल्याचे समजते. (वृत्तसंस्था)सुरुवातीला आघाडी, नंतर एकजूटया तणावांना पूर्णविराम देण्यासाठीच राव प्रादेशिक राजकीय पक्षांना एकत्र बांधण्याची योजना तयार करीत आहेत. धर्मनिरपेक्ष विचारांच्या प्रादेशिक समविचारी पक्षांना सामाजिक न्यायाच्या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा आमचा हेतू आहे, असे खा. बी. विनोद कुमार म्हणाले. सुरुवातीला राजकीय पक्षांची असे त्याचे स्वरूप दिसेल, पण नंतर ते एकत्र आल्याचे दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस