वन संवर्धन योजना तयार

By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:59+5:302015-01-22T00:06:59+5:30

हायकोर्ट : मनसर-खवासा रोड चौपदरीकरणाचा प्रश्न

Preparation of forest conservation scheme | वन संवर्धन योजना तयार

वन संवर्धन योजना तयार

यकोर्ट : मनसर-खवासा रोड चौपदरीकरणाचा प्रश्न

नागपूर : मनसर-खवासा महामार्ग चौपदरीकरणापुढील एक अडथळा दूर झाला आहे. या कामासाठी आवश्यक वन संवर्धन योजना वन विभागाने तयार केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही योजना २८ जानेवारीपर्यंत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या तारखेला न्यायालयाने मुख्यमंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी पुढाकार घेऊन याप्रकरणातील अडथळे दूर करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. वन विभागाची परवानगी नसल्यामुळे सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर-खवासा रोडचे चौपदरीकरण रखडले आहे. हा ३७ किलोमीटरचा रोड अत्यंत खराब झाला आहे. न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. ॲड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे ॲड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली.

Web Title: Preparation of forest conservation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.