पाटणसावंगी टोलनाका हटविण्याची तयारी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30
हायकोर्ट : महामार्ग प्राधिकरणचे प्रतिज्ञापत्र सादर

पाटणसावंगी टोलनाका हटविण्याची तयारी
ह यकोर्ट : महामार्ग प्राधिकरणचे प्रतिज्ञापत्र सादर नागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नागपूर येथील प्रकल्प संचालक राम मिश्रा यांनी पाटणसावंगी जवळील वादग्रस्त टोलनाका दुसरीकडे हलविण्याची तयार दर्शविली आहे. त्यांनी यासंदर्भातील शिफारस व मंजुरीपत्र सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बुधवारी ही माहिती देण्यात आली.सध्या सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर टोलनाका कुठे स्थानांतरित करायचा यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सक्षम अधिकाऱ्यांना प्रस्ताव निकाली काढण्यासाठी आठ आठवड्यांचा वेळ दिला आहे. नागपूर-बैतुल राष्ट्रीय महामार्गावरील पाटणसावंगी टोलनाक्याविरुद्ध पाटणसावंगीच्या सरपंच आशा खंडाळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. टोलनाक्याच्या आधीच पाटणसावंगीला जाण्याचा रस्ता असून हा रस्ता टोलनाक्यानंतर येणाऱ्या सावनेरमधून महामार्गाला मिळतो. यामुळे पथकर वाचविण्यासाठी वाहनचालक पाटणसावंगी मार्गाचा उपयोग करतील. परिणामी पाटणसावंगीतील रस्ते खराब होतील. अपघात वाढतील, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे ॲड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे ॲड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.