शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विचारपूर्वक शरीरसंबंध ही फसवणूक नव्हे : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:37 IST

महिलेची सहमती गैरसमजुतीवर आधारित असू शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लग्नाच्या खोट्या वचनांचे पुरावे नसतील तर महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारीरिक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. अनुप कुमार मेंदीरत्ता यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात एका महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता. नंतर दोघांनी लग्न करून हे प्रकरण परस्परांत मिटवून घेतले. हे प्रकरण दोघांनी सहमतीने मिटविले असल्याने पुरुषाविरोधातील बलात्काराचा खटला रद्द करण्यात येत आहे, असे न्या. मेंदीरत्ता यांनी म्हटले.

या प्रकरणी महिलेने आपल्या मूळ तक्रारीत म्हटले होते की, आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला. आपल्या परिवाराने आपले दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरवले आहे, असे कारण त्याने सांगितले. नंतर दोघांत समझोता होऊन दोघांनी लग्न केले. याची माहिती उच्च न्यायालयास देण्यात आली. महिलेने न्यायालयास सांगितले की, तक्रार गैरसमजुतीतून दाखल झाली होती. परिवाराच्या विरोधामुळे त्याने माझ्याशी लग्न करण्यास असमर्थता दर्शविली होती. वास्तविक तसा त्याचा मूळ हेतू नव्हता. आता मी त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहत आहे. हा खटला मी पुढे चालवू इच्छित नाही. यावर न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी पुरुषाने स्वेच्छेने महिलेसोबत लग्न केले. त्यामुळे त्याने दिलेले लग्नाचे वचन मोडण्याच्या हेतूनेच दिले होते, असे म्हणता येत नाही. भादंवि कलम ३७६ (बलात्कारासाठी शिक्षा) अन्वये कार्यवाही सुरू ठेवण्याऐवजी खटला रद्द करणेच योग्य आहे. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनातील सामंजस्यही टिकून राहील.

हायकोर्ट म्हणाले; थेट संबंध सिद्ध व्हायला हवाउच्च न्यायालयाने म्हटले की, पुरुषाने लग्न करण्याचे खोटे वचन दिल्याचा कोणताही पुरावा नसेल, तसेच आपल्या कृत्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजल्यानंतरही महिलेने या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा पर्याय निवडला असेल, तर शारीरिक संबंधांसाठीची तिची सहमती गैरसमजुतीवर आधारित होती, असे म्हटले जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात पुरुषाला दोषी ठरवायचे असेल, तर त्याने दिलेले वचन आणि महिलेने शारीरिक संबंधांस दिलेली सहमती यांत थेट संबंध असल्याचे सिद्ध व्हायला हवे.

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिप