शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

कंडक्टरच्या मुलाची कमाल! UP PCS मध्ये सेकेंड टॉपर; आता होणार डेप्युटी कलेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:06 IST

प्रेम पांडे हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होताच एयरफोर्स सर्जेंट म्हणून नोकरी मिळाली.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने PCS 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, उत्तर प्रदेशच्या देवबंदमध्ये राहणारा सिद्धार्थ गुप्ता हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. त्याचवेळी प्रयागराज येथील प्रेम पांडे हा परीक्षेत दुसरा टॉपर ठरला आहे.

प्रयागराजच्या बेली कॉलनीत राहणारे नारायण पांडे यांच्या कुटुंबाची राज्यात चर्चा रंगली आहे. कंडक्टर असलेल्या नारायण पांडे यांचा मुलगा प्रेम  पांडे याने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या PCS 2023 च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे. त्यानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी घरी लोकांची खूप गर्दी झाली होती.

नारायण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पांडे हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होताच एयरफोर्स सर्जेंट म्हणून नोकरी मिळाली. यावेळी त्याने कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातून बीए आणि एमएचं शिक्षण घेतलं. यानंतर त्याने 2020 मध्ये राजीनामा दिला आणि 2021 मध्ये रिव्ह्यू ऑफिसरच्या भरतीमध्ये निवड झाली. 

यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर होण्याचं प्रेमचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याने 2022 मध्ये पहिल्यांदा UP PCS ची परीक्षा दिली. तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला आणि मुलाखतीलाही बसला पण शेवटी त्याला अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आलं नाही. यानंतर त्याने आपल्या चुका सुधारल्या आणि पुन्हा एकदा यूपी पीसीएस परीक्षेत बसला आणि यावेळी त्याने संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी