गाझियाबादमध्ये जुन्या प्रियकराने विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील मोदीनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. विवाहितेचा एक्स बॉयफ्रेंड दुपारच्यावेळी ती बेडरुममध्ये झोपलेली असताना घुसला आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने विरोध केल्यावर प्रेयसीच्या आजीला धक्का देऊन तो पळून गेला.
तसेच पळताना त्याने विवाहित प्रेयसीला धमकी दिली. पोलिसांमध्ये तक्रार केलीस तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. भोजपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
या विवाहितेनुसार लग्नापूर्वी एका तरुणासोबत तिचे प्रेमप्रकरण होते. लग्नानंतर तिने त्या तरुणाशी बोलणे बंद केले होते. तरीही तिचा प्रियकर तिच्यावर संपर्कात राहण्याचा दबाव टाकत होता. काही दिवसांसाठीच ही विवाहित प्रेयसी माहेरी आली होती. प्रियकराला जेव्हा समजले तेव्हा तो ती झोपलेली असताना भींत ओलांडून आला व तिच्या खोलीत जात तिच्यासोबत अश्लिल चाळे करू लागला.
तिने विरोध केला, ओरडली हे ऐकून तिची आजी तिच्या खोलीत आली, तेव्हा प्रियकराने आजीला धक्का देऊन पळून गेला. विवाहितेने आता नवा घरोबा केला आहे, यामुळे ती या जुन्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळल्याचे सांगत आहे. यामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनुसार त्यांनी गुन्हा दाखल केला आहे, लवकरच त्याला अटक केले जाणार आहे.