शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागराज हिंसाचार; मुख्य आरोपीविरोधात मोठी कारवाई, बुलडोझरने घर पाडण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:22 IST

Prayagraj violence: प्रयागराज हिंसाचाराचा मास्टरमाइंड जावेद पंप याचे बेकायदेशीर असलेले घर बुलडोझरने पाडण्यात येत आहे.

प्रयागराज: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी प्रयागराजमध्ये कारवाई सुरू केली आहे. प्रयागराजच्या अटाळा भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी जावेद पंप याला पोलिसांनी अटक केली होती. या हिंसाचाराचा सूत्रधार जावेद पंप असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आता जावेद पंपच्या अटकेनंतर प्रयागराज विकास प्राधिकरण अर्थात पीडीएही कारवाईत आले आहे.

पोलिसांनी सामान घराबाहेर काढलेपीडीएने जावेद पंपच्या घरावर नोटीस चिकटवून त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मोठा पोलीस फौजफाटा जावेदच्या घरी पोहोचला आहे. पोलीस प्रशासनाने जावेदच्या घराचे छावणीत रूपांतर केले असून, बुलडोझरने घर पाडण्यास सुरुवात केली आहे. पोलीस जावेद पंपच्या घरात घुसले असून, घरातील सामान बाहेर काढले जात आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर पोलिसांनी खुर्च्या आणि इतर वस्तूही खाली फेकल्या. 

बेकायदा बांधकाम असल्याची माहितीपीडीएने दिलेल्या नोटीसमध्ये घरात राहणाऱ्या सर्व लोकांना आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे सामान काढण्यास सांगितले होते. प्रयागराज विकास प्राधिकरणाने चिकटवलेल्या नोटीसमध्ये बेकायदा बांधकाम असल्याचे म्हटले आहे. प्राधिकरणाची परवानगी न घेता तळमजला आणि पहिला मजला बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे पीडीएच्या नोटिसीत म्हटले आहे. यासाठी 10 मे 2022 रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. 24 मे रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु जावेद किंवा जावेदचे वकील हजर झाले नाहीत. या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड तयार करण्यात आलेले नाही.

95 विरोधात गुन्हा दाखलप्रयागराज हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 95 नावे आणि पाच हजार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम, जीशान रहमानी, सपा नगरसेवक फजल खान, दिलशाद मन्सूरी, मजदूर सभेचे नेते आशिष मित्तल आणि टिपू याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा