शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मुस्लिमांना महाकुंभात प्रवेशबंदी? CM योगी आदित्यनाथ म्हणाले- 'कोणीही येऊ शकते, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:50 IST

Prayagraj Mahakumbh 2025 : 'महाकुंभात जाती-पातीच्या भिंती नाहीशा होतात. इथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. '

Prayagraj Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे. देश-विदेशातील असंख्य साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 13 जानेवारीला महाकुंभाची सुरूवात होईल. दरम्यान, महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशावरुन राजकारण तापले आहे. मुस्लिमांना महाकुंभात प्रवेश देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. या सर्व वादावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वाचे भाष्य केले. 

प्रत्येकाचे महाकुंभात स्वागत, पण...हिंदी वृत्तवाहिनी आज तकच्या कार्यक्रमात महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'जो स्वत:ला भारतीय समजतो, मनात भारतीय सनातन परंपरेबद्दल आदराची भावना आहे, ज्यांना भारताच्या चिरंतन परंपरेबद्दल आदर आहे, त्यांनी महाकुंभात यावे, कोणीही रोखणार नाही. पण, जर कोणी चुकीच्या मानसिकतेने महाकुंभात येत असेल, त्याच्यासोबत वेगळ्या पद्धतीचा व्यवहार केला जाईल. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांनी नाही आले तर बरे होईल. पण भक्तीभावाने येणाऱ्या प्रत्येकाचे महाकुंभात स्वागत आहे', अशी प्रतिक्रिया योगींनी दिली.

महाकुंभात जाती-धर्माच्या भिंती उद्ध्वस्त होतात

सीएम योगी पुढे म्हणाले की, 'महाकुंभला कोणीही येऊ शकतो. महाकुंभ हे एक असे ठिकाण आहे, जिथे जाती-पातीच्या भिंती नाहीशा होतात. इथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. महाकुंभ वसुधैव कुटुंबकमचे विशाल रुप आहे, जिथे देश आणि जगभरातून लाखो भाविक येतात. इथे कोणाशीही भेदभाव केला जात नाही. राज्यात अनेक लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी दबावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण, आज ते स्वतःला सनातनी मानतात आणि महाकुंभात येऊन पवित्र स्नानाचा अनुभव घेतात. ही जमीन आमची आहे, आम्ही त्यावर कब्जा करू, असे सांगणाऱ्यांना महाकुंभात जागा नाही,' असेही योगींनी यावेळी स्पष्ट केले.

'बंटेंगे तो कटेंगे' ध्रुवीकरणाची घोषणा नाही

योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान एक है तो नेक आहे, बटेंगे तो कटेंगे, अशा घोषणा दिल्या होत्या. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला योगी म्हणाले की, 'हे हिंदू ध्रुवीकरण नाही, हिंदू ध्रुवीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे भारताच्या इतिहासाबद्दल आहे. लोकांना इतिहासाकडे पाहण्याची आठवण करून देण्याची ही संधी आहे. एकदा इतिहासाकडे पाहा, तेव्हा तुम्हाला दिसेल की, जेव्हा-जेव्हा आपण विभाजित झालो, तेव्हा गुलामगिरीत अडकलो आहोत. इतिहासाच्या त्या चुकांमधून धडा घेतला तर अशी परिस्थिती पुन्हा कधीच येणार नाही. '

महाकुंभात अदानी समूहाची सेवा; दररोज 1 लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप...

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमHinduहिंदू