प्रतापनगरात चोरी एक लाखाचे दागिने लंपास

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30

नागपूर : उघड्या दारातून शिरून चोरट्यांनी एका घरातून एक लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, ज्या वेळी चोरी झाली त्यावेळी घरात वृद्ध दाम्पत्य हजर होते.

Pratapangagarat stolen a lacquer jewelry lump | प्रतापनगरात चोरी एक लाखाचे दागिने लंपास

प्रतापनगरात चोरी एक लाखाचे दागिने लंपास

गपूर : उघड्या दारातून शिरून चोरट्यांनी एका घरातून एक लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, ज्या वेळी चोरी झाली त्यावेळी घरात वृद्ध दाम्पत्य हजर होते.
चंदू विठोबा सेलोकर (वय ३५) आणि त्यांची पत्नी खासगी नोकरीवर आहेत. ते प्रतापनगरातील धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी रात्री ७.३० वाजता पती-पत्नी आपल्या कर्तव्यावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी रात्री परत आले. या दरम्यान त्यांचे वृद्ध आईवडील घरी हजर होते. चोराने उघड्या दारातून आत प्रवेश करून शयनकक्षातील कपाटात ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेलोकर यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.
--

Web Title: Pratapangagarat stolen a lacquer jewelry lump