शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला मुख्यमंत्री केलं, त्याच्याच कट्टर विरोधकाला बळ देणार? प्रशांत किशोर यांच्या भेटीने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 12:45 IST

प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखली होती.

Prashant Kishore ( Marathi News ) : मागील काही वर्षांत भारतीय राजकारणात तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने आखल्या जाणाऱ्या रणनीतीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणूक रणनीतीच्या बाबतीत भारतात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव म्हणजे प्रशांत किशोर. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतरच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या विजयात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. याच प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखण्याचं काम पाहिलं होतं आणि त्या निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमतही मिळालं होतं. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र ही संस्था जगनमोहन रेड्डी यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या टीडीपी पक्षाचे काम करणार असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नुकतीच टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि प्रशांत किशोर यांची भेटही झाली आहे.

प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मी यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचा निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र असं असतानाही त्यांनी चंद्रबाबू नायडू यांची भेट घेऊन तब्बल तीन तास खलबतं केल्याने ते टीडीपीच्या रणनीतीला हातभार लावणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भेटीनंतर काय म्हणाले प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. "अनेक दिवसांपासून आमची ही भेट प्रलंबित होती आणि मी त्यांना म्हटलं होतं की एखाद्या दिवशी भेटायला येईल. त्यानुसार आज मी आलो आहे," असा खुलासा किशोर यांनी केला आहे.

वायएसआर काँग्रेसने साधला निशाणा

प्रशांत किशोर आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर वायएसआर काँग्रेस पक्षाच्या एकामागोमाग एक करत अनेक नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. "जेव्हा मूळ साहित्यच खराब असेल तर गवंडी येऊन तरी काय करणार," अशा शब्दांत जगनमोहन रेड्डी यांचे खंदे समर्थक आणि आंध्र प्रदेशचे जलसंपदा मंत्री ए रामबाबू यांनी या भेटीवर टीका केली आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAndhra Pradeshआंध्र प्रदेश