शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

Prashant Kishor: प्रशांत किशोर नवीन पक्षाची घोषणा करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 10:19 IST

Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज पाटण्यात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Prashant Kishor: आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी फार महत्वाचा असणार आहे. आज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या आपल्या राजकीय रणनीतीबाबत मोठा खुलासा करणार आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथील ज्ञान भवनात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. प्रशांत किशोर हे भाजप, काँग्रेस यांसारख्या मोठ्या पक्षांबरोबरच जेडीयू, तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षांसाठी रणनीतीकार राहिले आहेत.

पीके नवीन पक्ष स्थापन करणार?काही दिवसांपूर्वीच पीके काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, काँग्रेसला पीकेंच्या काही अटी न अवडल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे, ते नवीन पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पीके पक्ष स्थापन करणार का? पक्षाचे नाव काय असेल? प्रादेशिक पक्ष असेल का राष्ट्रीय? या प्रश्नांची उत्तरे आजच्या पत्रकार परिषदेतून मिळतील. 

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर चर्चेत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेवर आणल्यामुळे प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एक उत्कृष्ट निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख देशभर पसरली. निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ते नेहमीच पडद्याआड राहिले आहेत. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी आफ्रिकेतून युनायटेड नेशन्स (UN) ची नोकरी सोडून पीके 2011 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील झाले. मोदींच्या चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन यासारख्या प्रगत विपणन आणि जाहिरात मोहिमांचे श्रेय पीकेंना जाते. ते इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) नावाची संस्था चालवतात. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका