शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishor यांनी विरोधकांना सांगितला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला, गणितही समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 21:46 IST

"सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही."

पाटणा - बिहारमध्ये जनसुराज यात्रा करत असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, राहुल गांधींना अपात्र ठरविणे दुर्दैवी आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. नियम आपल्या जागी आहेत. भाजपचे दिग्गज आदरणीय नेते दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक वाक्य आहे की, 'छोट्या मनाने कोणीही मोठा होत नाही'. न्यायालयाने जो काही निर्णय द्यावयाचा होता तो दिला. पण मला वाटते की सरकारमधील लोकांनी राहुल गांधींना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता.

तसेच, उच्च न्यायालयानेही हाच निर्णय दिला असता, तर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यावर कुणीही आक्षेप घेतला नसता. एवढेच नव्हे तर, सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. ते एका खासगी वृत्तवाहीनीसोबत बोलत होते.

प्रशांत किशोर यांनी दिला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला -यावेळी प्रशांत किशोर यांनीही 2024 मध्ये भाजपला हरविण्याचा फॉर्म्युलाही सांगितला. ते म्हणाले, की 2019 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 38 टक्के मते मिळाली होती. हे सोप्या भाषेत असे समजून घ्या की, 100 लोक मतदानासाठी गेले होते, यांपैकी 62 लोकांनी विरोधी पक्षांना मत दिले. आता बहुमताचा विचार केला तर, 62 लोकांनी भाजपला मत दिले नाही. भाजपला केवळ 38 लोकांनीत मतदान केले. यामुळे, आता गरज आहे, ती या विखुरलेल्या 62 जणांना कोणीतरी एकत्रित करण्याची अर्थात, पक्षांना आणि नेत्यांना एकत्र करण्याची. जगातील प्रत्येक गोष्टीवर तोडगा आहे.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाBiharबिहारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी