शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

'भाजपमध्ये जातो तो संत होतो...', केजरीवालांच्या अटकेवर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:35 IST

'ईडी-सीबीआयने त्यांचे काम करावे, चूक असेल त्याची चौकशी करावी.'

Prashant Kishor on Arvind Kejriwal Arrest:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी अटक केली. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाली आहे. ईडीच्या या कारवाईवरुन विरोधकांनी भाजपला फैलावर घेतले. तसेच, आम आदमी पक्षानेही शुक्रवारी अटकेविरोधात निदर्शने केली. या सगळ्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनीदेखील या कारवाईवरुन भाजप आणि ED वर प्रश्न उपस्थित केले आहेत. मीडियाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशात ED विरोधी प्रतिमा तयार झाली आहे. जो भाजपसोबत नाही, त्याच्यावर ईडी-सीबीआय छापे टाकते, असे अनेकांना वाटत आहे. ईडी-सीबीआयने त्यांचे काम केले पाहिजे, ज्याची चूक असेल त्याची चौकशी करुन शिक्षा दिली पाहिजे, त्यात काही गैर नाही. पण, एखाद्या व्यक्तीविरुद्ध तपास सुरू झाला आणि तो भाजपमध्ये गेला, तर त्याच्याविरोधातील चौकशी थांबते.

लालू यादव असोत, टीएमसी असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा इतर कुणीही असो. देशातील लोकांना या कारवाईची कोणतीही अडचण नाही. अडचण अशी आहे की, ज्या व्यक्तीविरोधात तपास सुरू असतो, तो उद्या भाजपमध्ये गेला तर संत होतो. लोकांना याचा या गोष्टीचा आहे. कालपर्यंत कायद्याच्या नजरेत चूक करणारा, दोषी असणारा भाजपमध्ये गेल्यावर शुद्ध होतो. म्हणूनच लोक भाजपला वॉशिंग मशीन म्हणतात. तपास यंत्रणेचा वापर फक्त विरोधकांना घाबरवण्यासाठी केला जातोय का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPrashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा