प्रशांत देवरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T22:20:34+5:302015-12-14T23:53:02+5:30
दवाखान्यातून घरी रवानगी

प्रशांत देवरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
दवाखान्यातून घरी रवानगी
नाशिक : जिल्हा परिषदेतील माकप गटनेते प्रशांत देवरे यांची प्रकृती सुधारली असून, रविवारी (दि.१३) सायंकाळीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे यांचे प्रशांत देवरे चिरंजीव आहेत.
रविवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास प्रशांत देवरे यांच्या मतदारसंघात सुरगाणा येथे त्यांचे इनोव्हा (एम.एच. १५ ५२७७ ) या कारने जात असताना आशेवाडी गावाजवळ त्यांच्या इनोव्हा कारला गुजरातकडून नाशिकला येणार्या खासगी लक्झरी बसने समोरून धडक दिली होती. या अपघातात जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्यासह चालक व अन्य एक जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ नाशिक येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चालक व अन्य एका सहकार्याला जास्त दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर प्रशांत देवरे यांना रविवारी सायंकाळीच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर, तर छातीला मुकामार लागला आहे. काल प्रशांत देवरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. (प्रतिनिधी)