शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:34 IST

गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टातील घडामोडी चर्चेत आहेत. आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे.  

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टातील घडामोडी चर्चेत आहेत. आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींना लिखित स्वरूपात त्यांनी तक्रार केली आहे. प्रशांत भूषण यांनी यासंबंधी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पाच न्यायमूर्तींमध्ये 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणा-या चार न्यायाधीशांचाही समावेश आहे. तक्रारीत सरन्यायाधीश दिपक मिश्रांच्या विरोधात चार मुख्य आरोप असल्याचं भूषण म्हणाले. जस्टिस चेलमेश्‍वर, जस्टिस गोगोई, जस्टिस जोसेफ, जस्टिस एम बी लोकुर आणि जस्टिस ए के सीकरी यांना लिखित तक्रार देण्यात आली आहे.  काय आहे तक्रार -  - मेडिकल कॉलेज घोटाळ्याप्रकरणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. - न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी या कथित घोटाळ्याची सुनावणी करण्यासाठी एक संवैधानिक खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिला  होता. - मात्र,  नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश मिश्रा यांनी हा आदेश बदलला होता. - हाच मुद्दा पुढे करत भूषण आणि बेजबाबदारपणा आणि अनियमिततेचे आरोप करत न्या. मिश्रा यांच्या चौकशीची मागणी केली आहे. - प्रसाद एज्युकेशन ट्रस्टच्या  मेडिकल कॉलेजसाठीच्या मान्यतेबाबतचं हे प्रकरण असून सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय