शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

प्रसार भारतीचे आता स्वतंत्र भरती मंडळ; अध्यक्षपदी जगदीश उपासने यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:46 AM

वरिष्ठ पत्रकार जगदीश उपासने यांची १ जुलै रोजी भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : प्रसार भारतीसाठी स्वतंत्र भरती मंडळ (रिक्रुटमेन्ट बोर्ड) स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १९९७ मध्ये प्रसार भारती (भारतीय नभोवाणी महामंडळ) अधिनियम १९९० तहत स्वायत्त संस्था म्हणून प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली होती. २३ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या प्रसार भारतीचे हे स्वत:चे पहिले स्वतंत्र भरती मंडळ असेल.

वरिष्ठ पत्रकार जगदीश उपासने यांची १ जुलै रोजी भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीपासून भारत सरकारमधील सहसचिव पदावरील अधिकाऱ्यापेक्षा कमी वेतन असलेल्या पदावर व्यक्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी पाच सदस्यांचे स्वतंत्र भरती मंडळ स्थापन करण्यात करण्यात आले असून, या मंडळाच्या अध्यक्षपदी उपासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळामार्फत प्रसार भारतीच्या अखत्यारीत येणाºया विविध संस्थांत (आकाशवाणी, टीव्ही वाहिन्या आदी) व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.

काही महिन्यांपूर्वी सूर्य प्रकाश हे निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी सरकार प्रसार भारतीच्या नवीन चेअरमनची नियुक्ती करणार आहे.भरती मंडळाचे सदस्य प्रसार भारतीच्या स्वतंत्र भरती मंडळात माहिती व नभोवाणी मंत्रालयालातील सहसचिव (बी-द्वितीय) मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतील. मंडळाच्या सदस्यांत दीपा चंद्र (सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक, कार्यक्रम प्रसार भारती), पी.एन. भक्त (सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक (अभियांत्रिकी), किम्बुओंग किपगेन (सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ), चेतन प्रकाश जैन (सरव्यवस्थापक, मनुष्यबळ, रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड) यांचा समावेश आहे.