कुष्ठरोगाविषयी जनमानसात सकारात्मक बदल शक्य- प्रणव मुखर्जी
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:00+5:302015-01-29T23:17:00+5:30
नवी दिल्ली-देश व समाजात कुष्ठरोग व कुष्ठरोग्यांप्रती असलेल्या वागणुकीत सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे व्यक्त केला. ३० जानेवारी रोजी असलेल्या कुष्ठ निवारण दिनानिमित्त हिंदी कुष्ठ निवारण संघाला श्ुाभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

कुष्ठरोगाविषयी जनमानसात सकारात्मक बदल शक्य- प्रणव मुखर्जी
न ी दिल्ली-देश व समाजात कुष्ठरोग व कुष्ठरोग्यांप्रती असलेल्या वागणुकीत सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे व्यक्त केला. ३० जानेवारी रोजी असलेल्या कुष्ठ निवारण दिनानिमित्त हिंदी कुष्ठ निवारण संघाला श्ुाभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. महात्मा गांधीजींच्या ३० जानेवारी २०१५ या शहीद दिनी हिंदी कुष्ठ निवारण संघ कुष्ठ निवारण दिनाच्या रूपात साजरा करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुखर्जी यांनी, गांधीजी कुष्ठरोगाने पीडित व्यक्तींविषयी विशेष प्रेम व सहानुभूती बाळगत असत असे म्हटले. अशा जनजागरणाच्या कार्यक्रमांमुळे कुष्ठरोग व त्याने पीडित व्यक्तींबाबत समाजाचा दृष्टिकोन व व्यवहारात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत मिळेल असे ते पुढे म्हणाले. या आजाराशी लढा देण्यासाठी व्यक्ती व संघटनांना अधिक बळ मिळेल असे प्रतिपादन त्यांनी पुढे केले.