शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा 'भारतरत्न' पुरस्काराने होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:54 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने  गौरवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने  गौरवण्यात येणार आहे.समाजसेवेतील महर्षी असे व्यक्तिमत्व असलेले दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने  गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर, राजकारणातील ऋषी व समाजसेवेतील महर्षी असे व्यक्तिमत्व असलेले दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी (8 ऑगस्ट) हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा जानेवारीमध्ये राष्ट्रपती भवनातून करण्यात आली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान मोठे आहे. राष्ट्रपती होण्याआधी प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमध्ये ते सर्वात ज्येष्ठ मंत्री राहिले. तर, नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा प्रभाव नानाजी देशमुख यांच्या मनावर होता. संगीतकार भूपेन हजारिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतासाठी घालवले. त्यांची पहाडी आवाजाचा गायक अशी ख्याती होती. भूपेन हजारीका हे त्यांची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध करत होते.

1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर आता प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि  भूपेन हजारिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. 'प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते आहेत. त्यांनी निस्वार्थीपणे देशसेवा केली आहे. मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल आनंद होत आहे, असे त्यांनी म्हटले होते. ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख समर्पित होते. ग्रामीण भागातील जनतेला सशक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. त्यांची भारतरत्नासाठी केलेली निवड योग्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. याचबरोबर, भूपेन हजारिका यांच्या संगीताचे अनेक चाहते आहेत. भारतीय संगीततज्ज्ञ म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्याबद्दल आनंद होत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. 

 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीIndiaभारत