शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 09:17 IST

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.

नवी दिल्लीदेशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या The Presidential Years या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचे अनेक उल्लेख आहेत. मोदी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात काही मुद्द्यांवरुन विस्तव जात नसल्याचंही अनेक प्रसंगातून दिसून आलं आहे. 

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. तर काही निर्णयांबद्दल कौतुकाचा वर्षाव देखील केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद होते, पण मुखर्जी यांच्या मनात मोदींच्या देशाप्रती असलेल्या समर्पण भावनेबद्दल अत्यंत सन्मान होता. 

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटायला आले तेव्हा मोदी त्यांच्यासोबत एका वृत्तापत्राचे कात्रण घेऊन आले होते. मुखर्जींनी दिलेल्या मुलाखतीचे ते कात्रण होते. मुलाखतीत मुखर्जींनी देशाला स्थिर जनादेशाची आशा व्यक्त केली होती. 

"नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहणासाठी माझ्याकडे एका आठवड्याचा कालावधी मागितला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. गुजरातमध्ये आपला उत्तराधिकाऱ्याचा मुद्दा सोडवायचा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं", असं प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. 

मोदींच्या परराष्ट्र नितीने प्रभावितपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र व्यवहार नितीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रभावित झाले होते. यासाठी पंतप्रधान मोदी अनेकदा सल्ला घेण्यासाठी भेट घ्यायचे. आपल्या शपथविधी सोहळ्याला सार्क परिषदेच्या नेत्यांना निमंत्रित करण्याच्या विचार देखील मोदींनी मांडला होता आणि त्यास मुखर्जी यांनी मंजुरी देत त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावेळी मुखर्जी यांनी मोदींना देशाच्या गुप्तचर विभागाशी याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंकाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा मुद्दा याच्याशी निगडीत होता. 

२०१४ साली भाजपच्या बहुमताबाबतचे विधानदेशात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी पियूष गोयल यांनी केलेल्या बहुमताच्या दाव्यावर आपल्याला शंका होती, असं मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. "नरेंद्र मोदींचा प्रचाराचा भरगच्च कार्यक्रम पाहिल्यानंतर मी त्यांच्या दाव्याकडे गंभीरतेने पाहू लागलो. मोदी देशाच्या जनतेच्या पसंतीस उतरले आणि त्यांनी आपला दावा सिद्ध करुन दाखवला", असं मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा