मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांना बँकिंग फं्रटिअर्सतर्फे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. दिल्ली येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या नॅशनल कॉ-आॅप. बँकिंग समिट-२०१६ या परिषदेत कर्नाड यांचा गौरव करण्यात आला. बँकिंग फ्रंटिअर्सने रिझर्व्ह बँकेच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली १२ परीक्षकांची समिती गठीत केली होती. त्यांनी नवी दिल्ली येथील परिषदेत बँकिंग पुरस्कार जाहीर केले. कर्नाड यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला. (प्रतिनिधी)
प्रमोद कर्नाड यांना दुसऱ्यांदा उत्कृष्ट सीईओ पुरस्कार
By admin | Updated: September 22, 2016 04:13 IST