शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:31 IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या व्हिडिओवरून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली सुरू केली आहे. त्यांच्या व्हर्च्युअल मेळाव्यासंदर्भात एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात अमित शाह म्हणाले आहेत की, पंतप्रधान मोदींनी कोरोनादरम्यान 51 कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या व्हिडिओवरून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच ट्विट  करून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे.  मेळाव्यात गृहमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, आभासी रॅलीचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराशी काही संबंध नाही, परंतु त्याचा संघर्ष कोरोनाच्या विरोधात आहे. मला लोकांशी संपर्क साधायचा आहे.त्याचवेळी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अमित शहांचा हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, "काय लज्जास्पद गोष्ट आहे. खोटेसुद्धा बरोबर बोलू शकत नाहीत." प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. लोकांनीही प्रकाश राज यांच्या या ट्विटवर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. आभासी मेळाव्यात अमित शहा यांनी विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यासह ते म्हणाले की, कोरोना संकटात आमचा जनसंपर्काशी असलेला संस्कार आम्ही विसरू शकत नाही. मी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन करतो की, 75 व्हर्च्युअल मोर्चांद्वारे त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याची संधी दिली. प्रकाश राजबद्दल बोलायचं झाल्यास ते बॉलिवूडमध्ये कलाकार म्हणून अभिनयासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. आपल्या अभिनयातून दक्षिण चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमध्ये त्यांनी प्रचंड ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या संकटापायी प्रकाश राज हे फॉर्म हाऊसमधल्या शेतात वेळ घालवत आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करण्यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. बर्‍याच स्थलांतरित मजुरांना जागा देण्याबरोबरच त्यांनी त्यांना घरी पोहोचवण्यास मदत केली. यासह अभिनेत्याने लोकांमध्ये अन्न वाटप देखील केले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्या