शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:53 IST

श्रीपती शास्त्री व दामुअण्णा दाते यांनी जावडेकर यांची राजकीय जडणघडण केली. अभाविपमध्ये त्यांना यशवंतराव केळकर व बाळ आपटे यांनी मार्गदर्शन केले.

पुणे : प्रकाश जावडेकर यांच्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात पुणे शहराला सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. जावडेकर यांचे महाविद्यालयीन जीवन तसेच राजकीय सुरूवात पुण्यातूनच झाली.

श्रीपती शास्त्री व दामुअण्णा दाते यांनी जावडेकर यांची राजकीय जडणघडण केली. अभाविपमध्ये त्यांना यशवंतराव केळकर व बाळ आपटे यांनी मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते. त्याचवेळी त्यांचा गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर परिचय झाला. आणीबाणीमध्ये १३ महिन्यांचा कारावास त्यांना झाला. नंतर त्यांनी १९८१ मध्ये महाराष्ट्र बँकेचा राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

राज्यात पदवीधर मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. राज्यात प्रवक्ते तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी पदे जावडेकर यांनी भूषवली. प्रमोद महाजनांच्या आशिर्वादाने त्यांना केंद्रीय स्तरावर घेण्यात आले. तिथेही त्यांच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये मोदीप्रणित मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. पर्यावरणमंत्री असताना केलेल्या कामामुळे त्यांना मनुष्यबळ या महत्वाच्या पदावर बढती देण्यात आली. आता सलग दुसऱ्यांदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.जावडेकर गेली अनेक वर्षे दिल्लीतच कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबही दिल्लीतच आहे. त्यामुळे त्यांचे फारसे कार्यकर्ते पुण्यात नाहीत. त्यातच मागील वेळेस ते मध्यप्रदेश राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांचा पुण्यातील संपर्क बराच कमी झाला.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी