शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून स्तुतिसुमने

By Admin | Updated: November 21, 2015 02:33 IST2015-11-21T02:33:48+5:302015-11-21T02:33:48+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे उगवता तारा (रायझिंग स्टार) तर बिहारचे

Praise from Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून स्तुतिसुमने

शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून स्तुतिसुमने

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे उगवता तारा
(रायझिंग स्टार) तर बिहारचे
मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘सुशासन बाबू’ आणि ‘विकासाचे मसीहा’ आहेत, या शब्दांत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्तुतिसुमने उधळली.
नितीशकुमार यांच्याकडून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले; पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहता
आले नाही. नितीशबाबू
आणि लालूजी यांचा मी शुभचिंतक, प्रशंसक आणि मित्र आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. नितीश बाबू, लालूजी आणि रायझिंग स्टार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील हे सरकार यशस्वी होईल, असे टिष्ट्वट करीत सिन्हा यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Praise from Shatrughan Sinha