शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नथुराम गोडसे देशभक्त; प्रज्ञा सिंहांच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:39 IST

बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती.

नवी दिल्ली : भोपाळमधील भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभेत एका चर्चा सत्रादरम्यान महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त संबोधले. यावरून लोकसभेत एकच गदारोळ उडाला.  

बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. गोडसेने म्हटले होते, की त्याने महात्मा गांधींना का मारले होते? असा उल्लेख ए. राजा यांनी केला. ज्यावेळी ए राजा बोलत होते, त्याचवेळी तुम्ही एका देशभक्ताचे उदाहण कसे काय देऊ शकता, असा सवाल प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला.  गोडसेने महात्मा गांधीची हत्या का केली? असा संदर्भ देत होते. 

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या विधानानंतर लोकसभेत गदारोळ झाला. दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे विधान लोकसभेच्या कार्यवाहीतून हटविण्यात आले आहे. तसेच, भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या प्रकाराबद्दल भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल. 

दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. त्यावेळी दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाParliamentसंसदlok sabhaलोकसभाBJPभाजपा