शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला पण माझ्या मुलाला वाचवलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 12:11 IST

केला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत.

ठळक मुद्देकेला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत. प्रद्युम्नचे वडिल प्रद्युम्नला न्याय मिळावा यासाठी देत असलेल्या लढ्यामुळे आज केला देवी यांना त्याच्या मुलाला तुरूंगातून बाहेर पडताना पाहता येणार आहे.

गुरूग्राम- केला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत. प्रद्युम्नचे वडिल प्रद्युम्नला न्याय मिळावा यासाठी देत असलेल्या लढ्यामुळे आज केला देवी यांना त्याच्या मुलाला तुरूंगातून बाहेर पडताना पाहता येणार आहे. प्रद्युम्नच्या हत्येनंतर पोलिसांच्या स्कूल बसचा कंडक्टर असलेल्या अशोक कुमारला अटक केली होती. पण नंतर प्रकरणाने कलाटणी घेत शाळेतील अकरावीच्या मुलाने प्रद्युम्नची हत्या केल्याची कबुली त्या विद्यार्थ्याने दिली. या सगळ्यामुळे अशोक कुमारच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

बरूण ठाकूर यांनी त्यांचा मुलगा (प्रद्युम्न) गमावला पण त्यांनी माझ्या मुलाचं आयुष्य  वाचवलं. मी त्या कुटुंबाची नेहमीच ऋणी राहील, अशी भावना अशोक कुमार याची आई केला देवी यांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी बरूण ठाकूर यांचे आभार मानले. प्रद्युम्नच्या हत्येनंतर कंडक्टर अशोक कुमारला अटक झाली होती. पण प्रद्युम्नच्या वडिलांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला होता. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्यावं, यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर प्रद्युम्न हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली. 

अशोक कुमारला पोलिसांनी प्रद्युम्नच्या हत्येच्या दिवशीच म्हणजे 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासूनच अशोक कुमारच्या घरचे अशोक निर्दोश असून त्याला यामध्ये अडकविण्यात आल्याचं पोलिसांना सांगत होते. या आठवड्याच्या सुरूवातील प्रद्युम्नचा खरा मारेकरी सीबीआय तपासात समोर आल्यावर अशोकच्या घरच्यांनी निश्वास सोडला. अशोकला अटक झाल्यावर प्रद्युम्नच्या वडिलांनीही त्या अटकेवर संशय व्यक्त केला होता. 

अशोकने कुटुबीयांची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक लहान घर बांधणं आणि मुलांना चांगलं शिक्षण देणं, हेच त्याचं स्वप्न आहे, असं केला देवी यांनी म्हंटलं. अशोक कुमारला दोन मुलं आहेत. एक मुलगा आठ वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा आहे. आपले वडील लवकर घरी परत येतील, या आशेत अशोकची दोन मुलं त्यांची वाट बघतायेत. रोज संध्याकाळी पाच वाजता वडील कामावरून घरी येतात आणि मला बाजूच्या दुकानात चॉकलेट आणायला नेतात, असं अशोक कुमारच्या लहान मुलाने म्हंटलं आहे.   

टॅग्स :Pradhyumn murder caseप्रद्युम्न हत्या प्रकरणCrimeगुन्हाRyan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूल