शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्न हत्याकांड: सीसीटीव्हीतून झाला खुलासा, मृत्यूशी झुंजत होता प्रद्युम्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:23 IST

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुरूवारी रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. 

गुरूग्राम, दि. 14 - गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुरूवारी  रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. 

सीसीटीव्ही नुसार, 8 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस कंडक्टर शाळेत पोहोचला होता. सर्वात आधी ड्रायव्हर अशोकने बस शाळेच्या आवारात उभी केली आणि त्यानंतर प्रद्युम्नला मारण्यासाठी तो शाळेच्या मेन गेटमधून आतमध्ये गेला आणि थेट टॉयलेटमध्ये पोहोचला. फुटेजमधून खुलासा झाल्यानुसार दोघं एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये गेले होते.कोणताही तिसरा व्यक्ती शाळेच्या टॉयलेटमध्ये गेला नव्हता हे देखील सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालं आहे. ही घटना सकाळी 7 वाजून 55 ते 8 वाजून 5 मिनिटांदरम्यान घडली. 

सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी प्रद्युम्न शाळेत येतो. त्याचे वडील वरूण ठाकूर त्याला आणि त्याच्या बहिणीला शाळेच्या मेन गेटवर सोडतात आणि निघून जातात. शाळेत गेल्यावर प्रद्युम्नची बहिण तिच्या वर्गात जाते तर प्रद्युम्न वर्गात जाण्याआधी शेजारच्या टॉयलेटमध्ये जातो. प्रद्युम्न टॉयलेटमध्ये जाण्याआधी अशोक त्याच टॉयलेटमध्ये गेलेला असतो. थोड्याचवेळात प्रद्युम्न हा देखील त्याच टॉयलेटमध्ये जातो.  8 वाजता प्रद्युम्न आणि अशोक एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये दाखल होतात. 8 वाजून 10 मिनिटांनी अशोक टॉयलेटमधून बाहेर येताना दिसतो. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्न टॉयलेटमधून सरकत बाहेर येतो. त्याच्या तोंडातून कोणताही शब्द बाहेर पडत नाही.  त्याचा एक हात स्वतःच्या मानेभोवती असतो आणि काही क्षणात तो कॉरीडोरमध्ये एका जागी थांबतो.

शाळेतला माळी सर्वप्रथम प्रद्युम्नला पाहतो आणि आरडाओरडा करतो. त्यानंतर आजूबाजूच्या वर्गातले शिक्षक वर्गाबाहेर येतात. प्रद्युम्नला पाहून काही जणांच्या तोंडातून किंकाळी निघते तर काही रडायला लागतात. याच गोंधळाचा फायदा घेऊन अशोक तेथे येतो आणि प्रद्युम्नला उचलतो. त्यानंतर एका शिक्षकाच्या गाडीतून प्रद्युम्नला रूग्णालयात नेलं जातं पण तेथे त्याला डॉक्टर मृत घोषीत करतात.  

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलMurderखूनCrimeगुन्हा