शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्न हत्याकांड : 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 20:46 IST

रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर यांच्या हत्येप्रकरणी याच शाळेतील 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला गुरुग्राम बालन्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

गुरुग्राम : रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर यांच्या हत्येप्रकरणी याच शाळेतील 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला गुरुग्राम बालन्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. येथील रायन इंटरनॅशनल शाळेत प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणा-या 11 वीच्या विद्यार्थ्याला अटक केली असून त्याला दुपारी गुरुग्रामच्या बालन्यायालयात हजर केले होते. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या विद्यार्थ्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने असे म्हटले आहे, की रायन इंटरनॅशनल शाळेतील जवळपास 125 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची चौकशी केल्यानंतर या विद्यार्थ्याला अटक केली आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली अशी खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी प्रद्युम्नच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले. सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतले. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केले होते. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचे कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असेही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असेही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असे अशोक कुमारने सांगितले. 

टॅग्स :Courtन्यायालय