शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
3
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
4
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
5
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
6
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
7
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
13
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
14
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
15
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
16
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
17
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
18
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
19
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
20
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राजीव गांधींच्या हत्येवेळी जखमी झालेले प्रदीप व्ही. फिलीपांची 'ती' इच्छा कोर्टानं केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 5:45 AM

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला

ठळक मुद्देसेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केलातपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितलेप्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले

डॉ. खुशालचंद बाहेतीचेन्नई : राजीव गांधी हत्येच्या वेळी जखमी झालेल्या अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली टोपी व गणवेशावरील नावाची पट्टी निवृत्तीच्या दिवशी परिधान करण्याची इच्छा न्यायालयाने पूर्ण केली. प्रदीप व्ही. फिलीप हे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबुदूर येथील सभेच्या बंदोबस्तात होते. त्यावेळी ते अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. मानवी बाॅम्ब फुटला तेव्हा ते राजीव गांधीच्या जवळच होते, पण यातून ते आश्चर्यकारक रीत्या बचावले. त्यांची टोपी, नावाची पाटी व गणवेशाचा सरंजाम फेकला गेला व ते स्वत: गंभीर जखमी झाले.

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला. सेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केला. या वस्तूंशी त्यांच्या भावना जुळलेल्या असून ते हे सर्व निवृत्तीच्या दिवशी परिधान करू इच्छितात, असे न्यायालयास सांगितले. तपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्यांच्या भावनांची दखल घेतली आणि त्यांचा गौरवपुर्वक उल्लेख करत विनंती मान्य केली.  निवृत्तीनंतर न्यायालयाचा मुद्देमाल परत करण्याच्या अटीवर टोपी, नाम पट्टी व सरंजाम तात्पुरता प्रदीप व्ही. फिलीप यांना दिला.प्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांना २००३ मध्ये राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण व २०१२ मध्ये विशेष सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या टोपी व सरंजामात अधिकाऱ्यांच्या ३४ वर्षे सेवेत घेतलेल्या परिश्रमाच्या भावना दडलेल्या आहेत. त्यांनी सेवेत गाळलेला घाम व रक्ताचे ते प्रतीक आहे. न्यायालय त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून बजावलेल्या गौरवपूर्ण आणि निर्दोष सेवेला सलाम करते. निवृत्तीनंतर त्यांना शांततेचे दिर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, या शुभेच्छा. - टी. चंद्रशेखरन, प्रथम सत्र न्यायाधीश, चेन्नई

टॅग्स :Courtन्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी