व्यवहारात फसवणूक करणार्यास जामीन
By Admin | Updated: March 29, 2016 00:25 IST2016-03-29T00:25:49+5:302016-03-29T00:25:49+5:30
जळगाव : व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ातील संशयित आरोपीस सोमवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.

व्यवहारात फसवणूक करणार्यास जामीन
ज गाव : व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ातील संशयित आरोपीस सोमवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.सिन्दबाद केदारनाथ यादव (वय १९, रा.संभापाडा, ता.तलासरी, जि.पालघर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विठ्ठल सर्जेराव पवार यांची व्यवहारात फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीश के.एस. कुळकर्णी यांनी सिन्दबादला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.दोघांना लुटणार्यास जामीनदुचाकीवरून जाणार्या दोन जणांना अडवून मारहाण करीत लुटल्याप्रकरणातील संशयित आरोपी किरण कैलास पाटील (वय २५, रा.पाषाणसाई चौक, पुणे) यास सोमवारी न्यायाधीश कुळकर्णी यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात किरणविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.