भारत सराव
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:07+5:302015-02-13T00:38:07+5:30
सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम

भारत सराव
स ाव सत्रात टीम इंडियाने गाळला घामॲडिलेड : पाकविरुद्ध विश्वचषक मोहिमची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी गुरुवारी सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला. सकाळी सेंट पीटर्स मैदानावर संपूर्ण संघाने नेट प्रॅक्टिस केली. नंतर ॲडिलेड ओव्हलच्या इन्डोअर सभागृहात दोन आणि तीन खेळाडूंचे गट तयार करीत ट्रेनर व्ही. पी. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात शारीरिक व्यायामाचे धडे गिरविले. संघाचे वास्तव्य असलेले हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल आणि ओव्हल मैदान केवळ तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. खेळाडू येथे पायी चालत जातात.विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमी तसेच सुदर्शन हे विदेशी सुरक्षा रक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षकांसह आले. कोहलीने अधिकृत सराव पोषाख घातला नव्हता. तो काळ्या रंगाचे कपडे घालून आला. इन्डोअर ट्रेनिंग सेंटरच्या तळमजल्यावर आयसीसीचे ॲक्रिडिटेशन सेंटर आहे. पत्रकार येथे पासेस गोळा करण्यासाठी आले होते. सर्व पत्रकारांनी टीम इंडियाचा शारीरिक सराव पाहिला. रहाणे आणि शमी परस्परांपुढे १०- १२ फुटाच्या अंतरावर उभे होते. एकमेकांकडे ते मेडिसिन बॉल फेकताना दिसले. शमी, रहाणे आणि कोहली यांचा सराव पूर्ण होताच अक्षर पटेल व सुरेश रैना यांनी सरावात भाग घेतला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी उद्घाटन सोहळ्यासाठी गेल्यामुळे तो सरावात नव्हता.(वृत्तसंस्था)