शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात शक्तिप्रदर्शन; सिद्धरामय्या, शिवकुमार आज घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:23 IST

तथापि, हे दोन नेते शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले व त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप याबाबत ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या निमित्ताने भाजप विरोधक गटाचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळे.

नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार शनिवारी सत्तारूढ होत आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शनिवारी दुपारी १२:३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

तथापि, हे दोन नेते शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले व त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप याबाबत ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या निमित्ताने भाजप विरोधक गटाचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळे. शपथविधीसाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित केले आहे. सिद्धरामय्या यांना राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. 

आता आश्वासने पूर्ण करण्याचे असेल आव्हानकाँग्रेसने सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज (गृहज्योती), प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला २,००० रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी), दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक सदस्याला १० किलो तांदूळ (अण्णा भाग्य) मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. 

पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु. ३,००० आणि डिप्लोमाधारकांसाठी रु. १,५०० (दोघेही १८ ते २५ वयोगटांतील) दोन वर्षांसाठी (युवानिधी) आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास (शक्ती).

किती होणार मंत्री?कर्नाटकात ३४ जण मंत्री होऊ शकतात. या पदांसाठी अनेक इच्छुक आहेत. जनतेचा आवाज हाच कर्नाटक सरकारचा आवाज असेल, असेही ते म्हणाले. भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनाही निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

सिद्धरामय्यांकडे नाही मोबाईलअतिशय साधे राहणीमान असलेल्या सिद्धरामय्या यांच्याकडे मोबाईल नाही. १९८५ मध्ये ३८ व्या वर्षी ते मंत्री झाले होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभेच्या १२ निवडणुका लढल्या आहेत. यात ते नऊ वेळा विजयी झाले. सिद्धरामय्या १० वर्षे होईपर्यंत शाळेत जाउ शकले नव्हते. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक