शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 19:43 IST

भारतात विकसित झालेल्या UPI चा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकारने अनोखी योजना आखली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत. त्यांच्यासोबत त्या-त्या देशाचे एक शिष्टमंडळदेखील असेल. या शिष्टमंडळासाठी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. हे शिष्टमंडळ दिल्लीत विविध ठिकाणी फिरायला जाईल, तेव्हा त्यांना UPI द्वारे सहज पेमेंट करता यावे, यासाठी सरकारकडून त्यांच्या UPI ​​वॉलेटमध्ये 1,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.

UPI तंत्रज्ञानाने देशात कॅशलेस व्यवहारात खूप मोठा बदल घडवला आहे. ऑगस्ट महिन्यात UPI च्या माध्यमातून देशात 10 अब्जाहून अधिक व्यवहार झाले. आता भारत सरकारला हे डिजिटल पेमेंट सोल्यूशन जगभरात लोकप्रिय करायचे आहे. यासाठी G20 परिषदेचा पुरेपूर फायदा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 1,000 परदेशी पाहुण्यांना UPI चा अनुभव घेण्याची संधी दिली जाणार आहे.

UPI वॉलेटमध्ये पैसे जमा केले जातीलएका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, UPI चा अनुभव घेण्यासाठी सरकार परदेशी प्रतिनिधींना आणि सहभागींना त्यांच्या वॉलेटमध्ये 500 ते 1000 रुपयांची रक्कम देणार आहे. हे सर्व लोक त्यांच्या फोनवरुन वेगवेगळ्या ठिकाणी UPI पेमेंट करू शकतील. UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे.

UPI अनेक देशांमध्ये लोकप्रिय भारतात यशस्वी झाल्यानंतर UPI आता परदेशातही पोहोचत आहे. श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर यांनी UPI च्या वापरासाठी भारतासोबत करार केला आहे. हे सर्व देश स्वस्त, सुलभ पेमेंट टूल वापरण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना UPI पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. ते भारतातील प्रवासादरम्यान UPI ​​पेमेंट करू शकतात.  

टॅग्स :delhiदिल्लीG20 Summitजी-२० शिखर परिषदtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार