शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भारतीय महिलेचा पराक्रम; पाच दिवसांत दोन वेळा ‘एव्हरेस्ट’ सर

By admin | Updated: May 22, 2017 03:32 IST

भारतीय गिर्यारोहक अंशू जमसेनपा हिने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पाच दिवसांत दोनवेळा सर करून रविवारी इतिहास घडविला

इटानगर : भारतीय गिर्यारोहक अंशू जमसेनपा हिने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पाच दिवसांत दोनवेळा सर करून रविवारी इतिहास घडविला. दोन अपत्यांची आई असलेली अंशू (वय ३२) १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट सर करून परतली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तिने पुन्हा चढाई सुरू करून नेपाळी गिर्यारोहक फुरी शेरपा याच्या साथीने रविवारी सकाळी आठ वाजता पुन्हा माऊंट एव्हरेस्ट तिरंगा फडकावला. या दोन वेळा मिळून तिने आतापर्यंत पाच वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. याआधी एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्टवर पोहोचण्याचा विक्रम छुरिम शेरपा या नेपाळी महिलेने सन २०१२ मध्ये केला होता. अंशूने तो विक्रम रविवारी मोडला. अंशू अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक आहे. यापूर्वी १६ मे रोजी सकाळी सव्वानऊ वाजता तिने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर रविवारी सकाठी आठ वाजता ती एव्हरेस्टवर पोहोचली. पाच दिवसांत दोन वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला बनण्याचा मान तिने मिळविला. याशिवाय एव्हरेस्ट पाचव्यांदा सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. २०११ मध्ये तिने १० दिवसांत दोनवेळा हे शिखर सर केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये तिने नेपाळच्या बाजूने एव्हरेस्टवर चढाई केली होती. तिने एव्हरेस्टकडे कूच केल्यानंतर अरुणाचलमध्ये अनेक बौद्ध मठ, मंदिरात तिच्या यशासाठी प्रार्थना करण्यात आल्या. अंशूच्या दुसऱ्या चढाई पर्वाला तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनी गुवाहाटी येथे हिरवी झेंडी दाखविली होती. (वृत्तसंस्था)यशस्वी चढाईनंतर भारतीय गिर्यारोहक बेपत्ता, उतरताना संपर्क तुटलाकाठमांडू : माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून परतताना भारतीय गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळमधील अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. रवी कुमार असे या गिर्यारोहकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील रहिवासी आहे. रवी कुमार खाली येत असताना बाल्कनी भागात त्याचा संपर्क तुटला. गिर्यारोहकांनी दक्षिण शिखरावर चढाई करण्यापूर्वीच्या अंतिम विश्राम थांब्याला बाल्कनी भाग म्हणतात. अरुण ट्रेकचे व्यवस्थापकीय संचालक चेवांग शेरपा म्हणाले की, रवी कुमारने शनिवारी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी यशस्वीरीत्या एव्हरेस्ट सर केले.