ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्याच पत्रकार परिषदेत वीज गायब
By Admin | Updated: May 20, 2016 17:17 IST2016-05-20T17:17:03+5:302016-05-20T17:17:03+5:30
देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं आश्वासन देणा-या केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्र्यांच्यांच कार्यक्रमात वीज गायब झाली

ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्याच पत्रकार परिषदेत वीज गायब
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 20 - देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं आश्वासन देणा-या केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्र्यांच्यांच कार्यक्रमात वीज गायब झाली. ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांची पत्रकार परिषद चालू असताना एकदा नाही तर दोनवेळा वीज गायब झाली. विशेष म्हणजे वीज गेली तेव्हा पियूष गोयल ऊर्जा विभागावरच बोलत होते. दिल्लीतील नॅशनल मिडिया सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद सुरु होती.
वीज गायब झाल्यानंतर पियूष गोयल यांनी थट्ट मस्करी करत आपल्या पत्नीची आठवण आल्याचं सांगितलं. 'माझी पत्नी मला नेहमी म्हणते तुमच्या पत्रकार परिषदेत एकदा तरी वीज जाते. यामागचं कारण काय हे मलादेखील माहित नाही. आता ही वीज खरोखर गेली की मला सवय लावत आहेत हे मला माहित नसल्याचं', पियूष गोयल बोलले आहेत. पण यामुळे आपल्याला अजून खुप काम करायचं आहे हे दिसत असल्याचंही पियूष गोयल यांनी मान्य केलं आहे.
वीज आल्यानंतरही पियूष गोयल बोलत होते. मोदी सरकारने दोन वर्षात 7779 गावांत वीज पोहोचवली असून गेल्या 3 वर्षात हा आकडा 37 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती पियूष गोयल यांनी सांगितलं आहे.
#WATCH Power Minister Piyush Goyal's response when his press conference faces a power cut.https://t.co/HEtKPlMuke
— ANI (@ANI_news) May 20, 2016