शक्तिमानचा मृत्यू

By Admin | Updated: April 21, 2016 04:24 IST2016-04-21T04:24:42+5:302016-04-21T04:24:42+5:30

गेल्या महिन्यात आंदोलनादरम्यान भाजपाच्या आमदाराने केलेल्या मारहाणीत जखमी झालेला उत्तराखंड पोलिसांचा घोडा ‘शक्तिमान’ चा बुधवारी येथे मृत्यू झाला.

Power of Death | शक्तिमानचा मृत्यू

शक्तिमानचा मृत्यू

डेहराडून : गेल्या महिन्यात आंदोलनादरम्यान भाजपाच्या आमदाराने केलेल्या मारहाणीत जखमी झालेला उत्तराखंड पोलिसांचा घोडा ‘शक्तिमान’ चा बुधवारी येथे मृत्यू झाला.
डेहराडूनमध्ये १४ मार्चला भारतीय जनता पक्षातर्फे तत्कालिन मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपचे आमदार गणेश जोशी यानी पोलीस दलाचा भाग असलेल्या शक्तिमानच्या पायावर काठीने मारले होते. आ. गणेश
जोशी यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्या मारहाणीत शक्तिमानच्या पायाचे हाड मोडल्यानंतर तो जायबंदी झाला. शस्त्रक्रियेद्वारे त्याला कृत्रिम पाय बसविण्यात आला होता. परंतु त्याच्या संपूर्ण शरीरात संसर्ग पसरल्याने त्याची प्रकृती सामान्य होऊ शकली नव्हती. सायंकाळी येथील पोलीस लाईनमध्ये त्याचा मृत्यू झाला, असे डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. सदानंद दाते यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Power of Death