दारुच्या बाटलीत आढळली झुरळाची अंडी

By Admin | Updated: August 20, 2015 17:18 IST2015-08-20T17:18:21+5:302015-08-20T17:18:21+5:30

येथील एका रोजंदारी कामगाराने दारुच्या दुकानातून विकत घेतलेल्या दारुच्या बाटलीत झुरळाची अंडी आढळली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Poultry egg found in an alcohol bottle | दारुच्या बाटलीत आढळली झुरळाची अंडी

दारुच्या बाटलीत आढळली झुरळाची अंडी

>ऑनलाइन लोकमत
कोईम्बतूर, दि. २० -  येथील एका रोजंदारी कामगाराने दारुच्या दुकानातून विकत घेतलेल्या दारुच्या बाटलीत झुरळाची अंडी आढळली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 
काल रात्री येथील सरकारमान्य असलेल्या टॅसमॅक दुकानातून रोजंदारी कामगाराने  दारुची बाटली विकत घेतली. त्यानंतर त्याने ती खोलली असता त्यामध्ये झुरळांची अंडी असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याप्रकरणी या रोजंदारी कामगाराने दुकानातील कर्मचा-यांना सांगितले. त्यावर दुकानातील कर्मचा-यांनी झुरळची अंडी  सापडलेली बाटली परत देण्याची विनंती केली आणि त्याबद्दल दुसरी दारुची बाटली देऊ केली. मात्र या कामगाराने ती ऑफर नाकारली.  दरम्यान, या कामगाराने थेट तालुका अधिका-याकडे ती बाटली दिली असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Poultry egg found in an alcohol bottle