दिल्ली विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया स्थगित
By Admin | Updated: June 24, 2014 02:01 IST2014-06-24T02:01:45+5:302014-06-24T02:01:45+5:30
दिल्ली विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी 2क्14-15 शैक्षिणक सत्रसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्याने वादग्रस्त चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मुद्याने एक नवे वळण घेतले आहे.

दिल्ली विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया स्थगित
>नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी 2क्14-15 शैक्षिणक सत्रसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्याने वादग्रस्त चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मुद्याने एक नवे वळण घेतले आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या प्रिन्सिपॉल असोसिएशनची आपत्कालीन बैठक झाली. सक्षम अधिका:यांकडून स्पष्ट दिशानिर्देश दिले जात नाहीत, तोर्पयत प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे या बैठकीनंतर असोसिएशनचे अध्यक्ष एस.के. गर्ग यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार होती.
दरम्यान,चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मागे घेण्याचा आदेश जारी केल्याच्या एका दिवसानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष वेदप्रकाश यांनी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. या मुद्यावरील वाद संपण्याच्या दृष्टीने इराणी यांनी हस्तक्षेप केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी इराणी यांनी विद्यापीठाच्या अधिका:यांसोबत या मुद्याला उशिरा सोडविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आयोगाने काल विद्यापीठ व महाविद्यालयांना तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेण्यास अनुमती दिली आहे. मागील वर्षी लागू केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांर्तगत हे प्रवेश घेतले जाणार नाहीत हेही आयोगाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4दिल्ली विद्यापीठातील चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाबाबत सुरू असलेल्या वादामुळे विद्याथ्र्यामध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेदरम्यान आज केंद्राने हा वाद विद्यापीठ अनुदान आयोग व दिल्ली विद्यापीठाने सामंजस्याने सोडवावा, असे म्हणत तटस्थ भूमिका स्वीकारली आहे.